जिल्हा परिषद शाळा चौक, काहलपूर शाळेत 2016 साली लघु विज्ञान केंद्र देण्यात आले. शाळेतील विद्यार्थी अतिशय लहान घरातून येतात, बहुतेक विद्यार्थी हे आदिवासी घरातून आहे,शाळेत येण्यासाठी त्यांना 2-3 किलोमीटर चालून यावे लागते, शिक्षणाची आवड व भविष्यात चांगले जीवनासाठी त्यांची पालक दररोज तडजोड करत असतात. शिक्षणाच्या आधुनिक पद्धती नसतांना विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात।
STEM लेअरनिंग मार्फत वर्ष 2020 मध्ये राष्ट्रीय स्तरावर स्पर्धे चे आयोजन केले होते, त्या मध्ये प्रश्न मंजुषा, मॉडेल मेकिंग आणि रोबोटिक्स अश्या 3 विविध स्पर्धा होत्या. स्पर्धे चे वेळापत्रक समजताच शाळेतील शिक्षण आणि मुख्याध्यापक यांनी तयारी सुरु केली, पहिल्यांदा शिक्षकांना खूप साऱ्या शंका होत्या कि प्रवास कसा करायचा,कशी तयारी करायची, किंवा काय काय होणार स्पर्धे माडे? असे खूप प्रश्न त्यांच्या समोर होते कारण रोबोटिक्स (Robotics ) शब्द हा पहिल्यन्दा शालेय स्तरावर ऐकण्यात आला होता अँड अश्या स्पर्धे माडे विद्यार्थी काय करणार।
पण स्पर्धा हि नेहमी जिंकण्या साठी असते असं नाही, त्यामधून मिळणारे अणुभार हे जीवनात खूप उपयोगी ठरतात, शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती गिरी मॅडम ने स्पर्धे माडे आवर्जून संमीलन होण्याचे आश्वासन दिले, कारण बाहेरील जगाचे आरसा त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना दाखवायचा होता, हीच स्पर्धा त्यांना अजून जोमाने अभ्यास करण्यास प्रेरित करण्याचे साधन हि होती, दिनांक २० फेब्रुवारी 2020 रोजी श्रीछत्रपही शिवाजी महाराज विद्यालय वावंजे येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली. सर्व शाळेंनी स्पर्धेत आवर्जून भाग घेतला, सकाळी सकाळी 10 वाजता सगळ्या शाळेतील स्पर्धकांनी आपली हजेरी स्पर्धा स्थळावर लावली, जिल्हा परिषद चौक ची शाळा पण उपस्थित होती, सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप चॅन असे सामर्थ्य दाखवले. परंतु जिल्हा परिषद चौक च्या शाळेला यश मिळवता आले नाही।
जातांना श्रीमती गिरी मॅडम ने स्टेम कंपनी चे आभार मानले, स्पर्धा हि हार आणि जिंकण्यासाठी नसते तर हि आपली बुद्धी ची एक चाचणी असते आणि आपल्याला अजून किती तयारी कायची आहे ह्याची ओळख करून देण्यासाठी असते, पुढील वर्षी आम्ही पुन्हा भाग घेऊ आणि नक्कीच यश मिळवू ह्या शब्दात श्रीमती गिरी मॅडम ने आपला परतीचा प्रवास चालू केला।
***