प्रवास इटकूर ते बंगळुरू
स्टेम लेअरनिंग कंपनी मार्फत आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातल्या लहान लहान गावातून विद्यार्थ्यानि भाग घेतला होता. याच स्पर्धेच्या अंतिम चरण भारताच्या बंगळुरू या शहरात मध्ये होणार होता, भारतामधील जवळ जवळ २० राज्यातील विजेते विद्यार्धी बांगुळूर मध्ये एकमेकांच्या सामोरे येणार होते. बंगळुरू ला येण्यासाठी काहीविद्यार्थ्यांनी रेल्वेने प्रवास केला तर काही विद्यार्थ्यांनी विमानाने प्रवास केला आणि याचा सर्व खर्च कंपनी मार्फत करण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्यामधून इटकूर मधून शुभम कुंभार, काशीविश्वेश्वर कोरे आणि शशांक सावंत या तीन चुमकल्यांची निवड पण बंगळुरू च्या अंतिम फेरी साठी झाली होती. आणि तिघे आता आपल्या शाळेचे नाव म्हणजेच जिल्हा परिषद शाळा इटकूर चे नाव बंगळुरू मध्ये मोठं करण्या साठी स्तब्ध होते. ह्या चिमुकल्यांना आता इटकूर ते बंगलुरूर चा प्रवास करायचा होता, त्यांच्या प्रवासासाठी बस ची सोय कंपनीने केलेली होती आणि सोलारपूर वरून त्यांना बंगळुरू ला पोचवण्याची जीम्मेदारी हि माझी होती.
सोलापूरच्या बस स्टॉप ला भेटताच विद्यार्थ्यांनी माझ्यावर प्रश्नांचा वर्षाव केला, काय होणार अंतिम स्पर्धेत?, कास आहे बंगळुरू शहर?, तुम्ही अगोदर कधी गेले आहेत का बंगळुरू ला? हि प्रश्न विचारणं साहजिकच होती कारण कधी आपल्या गावातून बाहेर न गेलेली लहान मूल आज दुसऱ्या राज्यात जात होती आणि हे सर्व स्टेम लेअरनिंग कंपनी मुले साध्य झाले होते.
थोड्याच वेळात आमची बस आली आणि तिन्ही विद्यार्थ्यंनी खिडकी जावळी ची सीट आपल्या नावावर केली, तिघांचे डोळे बंगळुरू ला जाण्याऱ्या रस्त्यावर होते, प्रवास मधील येणारीसर्व ठिकाण आणि दृश्य त्यांना आपल्या डोळ्यात सवयीची होती. जेमतेच काही तासाच्या प्रवास करून आम्ही बंगळुरू ला पोचलो. सगळ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय बंगळुरू च्या नामांकित हॉटेल बंगळुरू इंटरनॅशनल इथे करण्यात आली होती.
हॉटेल ला पोहोचताच तुम्ही मुलांची डोळे हॉटेल चा आकार बघून चमचमू लागली होती कारण प्रत्येक व्यक्ती चे स्वप्न असते कि जीवनात तो एकदा तरी ५ स्टार असलेल्या हॉटेल मध्ये किमान एकदा तरी जाईल. आता वेळ होती स्पर्धेची , विद्यार्थ्यांनी त्यांना नेमलेल्या खोलीत जाऊन आराम केला आणि स्पर्धे साठी तयार झाले. ठरलेल्या वेळेनुसार स्पर्धेला सुरुवात झाली, आणि सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान असा प्रतिसाद देऊन स्पर्धा पार पडली, आपल्या तीन चिंकाळ्यांनी यश मिळवता आले नाही परंतु तिघेहि आपल्याला मिळालेला अणुभार घेऊन परतत होती. जाताना त्यांनी पुन्हा या स्पर्धेत भर घेण्याची इअछा दाखवली आणि पुडाच्या वरशी अजून मेहनत करून येऊ असे बोलू एका स्मृती हास्य घेऊन आपल्या परतीच्या प्रवासासाठी सुरुवात केली. विद्याथ्यांन सोबत मार्गदर्शक म्हणून आलेले शिक्षक माननीय कोकाटे सरांनी स्टेम कंपनीचे खूप आभार व्यक्त केले.
***
Also Read:
- Scientist Lecture – Dr. Jayant Joshi
- प्रश्न मंजुषा, मॉडेल मेकिंग आणि रोबोटिक्स – स्पर्धा
- Classroom to virtual Classroom
- Teachers Training Program I Teachers Development Program
- EFFECTS OF MINI SCIENCE CENTRE IN TEACHERS & STUDENTS